धाराशिव: न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील थोर समाजसुधारक होते. बुधवारी (दि.३०) रोजी अक्षय तृतीय तिथीनुसार जळकोट येथील श्री केदारलिंग मंदिरात बसवेश्वरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून फटाक्याच्या आतिश बाजीत पूजन करण्यात आले. त्यानंतर जळकोट ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम , व माजी सरपंच अशोक भाऊ कदम व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के ,ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, अनिल छत्रे, संजय माने, संजय अंगुले, महेश कदम, पत्रकार विजय पिसे ,गिरीश नवगिरे, रामशेट्टी पाटील,तमा कुंभार, अतिश मेंगले, लहू कदम, राजेंद्र कारले, विठ्ठल कटोरे, बसवराज भोगे, राजु पाटील, मल्लिकार्जुन कुंभार, महादेव खिल्लारे,सचिन माळगे, कृष्णा घोडके, शिवा कुंभार, अमोल आलुरे, सदाशिव हासुरे, बालाजी पालमपल्ले, विवेक पिसे, बाळासाहेब पाटील, गणेश कोरे, वैभव स्वामी, दयानंद साखरे, दादा कदम, सतीश कुंभार, महेश छत्रे, नागनाथ किलजे, अशोक यादगौडा, अविनाश डांगे, शिवराय यादगौडा, सुनील साखरे, बसवराज धरणे, पिंटू कारले व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.