मुरुम / प्रतिनिधी :-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाची डिलीट ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान खूपच मोठे आहे. प्रशासन क्षेत्रातील आदर्श प्रशासक आणि शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ते सुपरिचित आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका विद्यापीठाने त्यांना डिलीट ही मानद पदवी नुकतीच बहाल केली आहे .
यापूर्वी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाच्या विविध महत्त्वपूर्ण समित्यांवर भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर परिसर धाराशिवचे संचालक, धाराशिव जिल्ह्याच्या प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक,तर विद्यापीठाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांवर प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.
सध्या ते धाराशिव शहरातील नामांकित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख , अजीव सेवक आणि जनता सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत.
शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्राबरोबरच संशोधन क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले आहे. बहुजन समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे. महाविद्यालयामध्ये विविध विषयांचे पदव्युत्तर वर्ग व पीएच.डी.साठीची विविध विषयांची संशोधन केंद्र सुरू केली आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी माती परीक्षण केंद्र देखील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीने चालवले जाते.
या गौरवा बद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिव सौ शुभांगीताई गावडे,मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे , यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या मानद पदवी बद्दल प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.