spot_img
9.3 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम 

 

 

 

धाराशिव न्युज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी सोहळा साजरा केला जाणार आहे तरी जळकोट सह परिसरातील सर्व सदभक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्री भिमाशंकर कुंभार यांनी केले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की जळकोट येथील संभाजी नगर भागातील

श्री संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७०९ व्या पुण्यतिथी बद्दल

जळकोट ता.तुळजापुर जि.धाराशिव मध्ये काकांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२६ एप्रिल रोजी संध्याकाळी जळकोट पुरुष व महिला भजनी मंडळांच्या हस्ते हरिजागर व दि.२७ एप्रिल रोजी सकाळी मंदिरामध्ये अभिषेक,पुजन होईल.ठिक११वाजता ह.भ.प.श्री जगदीश महाराज उंद्रे मांजरी,(अध्यक्ष आध्यात्मिक विकास परिषद महाराष्ट्र राज्य) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच जळकोट व जळकोट वाडी येथील मृदंगचारी,विणेकरी,व टाळकरी यांच्या जयघोषात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर महाप्रसाद व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.तरी सर्वजण या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केली आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या