spot_img
5.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – फड

 

धाराशिव / प्रतिनिधी :-

धाराशिव शहरात उष्णतेची लाट वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.

नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे तसेच लिंबूपाणी, फळांचे रस, ताक यासारख्या थंड पेयांचे सेवन करावे. दुपारी १२ ते ३ या अत्यंत उष्णतेच्या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. गरज असल्यास डोक्यावर टोपी, छत्री, टॉवेल किंवा इतर पारंपरिक साधनांचा वापर करूनच बाहेर पडावे. तसेच मसालेदार अन्न, अल्कोहोल, चहा, कॉफी आणि गोड पदार्थांचे सेवन टाळावे. तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांची विशेष काळजी घ्यावी. अनवाणी बाहेर न जाण्याचेही नागरिकांनी भान ठेवावे असेही आवाहन फड यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या