spot_img
22.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

आदित्य गाढवेचा अणदूर येथे सत्कार 

 

अणदूर / प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जि प प्रा शाळा वत्सलानगर येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कु आदित्य दिनकर गाढवे यांनी जवाहर नवोदय परिक्षेत धाराशिव जिल्ह्यात द्वितीय येवून तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केल्याबद्दल विविध संस्था संघटनेच्या वतीने कु आदित्य गाढवे याचा यथोचित सत्कार करण्यात आला

आदित्य गाढवेनी जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करून जवाहर नवोदयचा अभ्यास करुन धाराशिव जिल्ह्यात द्वितीय येण्याचा मान मिळवला तर नुकत्याच झालेल्या मंथन परिक्षेत तुळजापूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे, आदित्य गाढवे यास मुख्याध्यापक सुरेखा दराडे,दत्ता आरदवाड, शिवदास भागवत, विवेकानंद खलाटे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे

त्यानिमित्त हॅलो मेडिकल फाउंडेशन, संत तुकाराम सामाजिक संस्था, तालुका पोलिस पाटील संघटना व खडकाळी माॅर्नींग ग्रुपच्या वतीने त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला

यावेळी धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके,हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या समन्वयक नागीनीताई सुरवसे, अणदूरचे पोलीस पाटील जावेद शेख,संत तुकाराम सामाजिक संस्थेचे कोषाध्यक्ष प्रबोध कांबळे,खडकाळी माॅर्नींग ग्रुपचे डॉ प्रसन्न कंदले,विलास गाढवे, सुकुमार गाढवे,दिनकर गाढवे, प्रभाकर गाढवे ,अंजली गाढवे, सुरेश गाढवे,अस्मिता गाढवे यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या