spot_img
5.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता

चिवरी प्रतिनिधी :- (बिभीषण मिटकरी)

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शुक्रवारी दि, १८ एप्रिल रोजी श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची ह भ प महंत महादेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्याा कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली. या सप्ताह कालावधीमध्ये ह.भ. प गिरीश राऊत महाराज , ह.भ.प लिंबराज चव्हाण महाराज, ह भ प स्वप्निल महाराज दौंडकर, ह.भ.प तुकाराम हजारे महाराज , ह भ प वैभव महाराज कानेगाव, ह भ प शंकर लोंढे महाराज यांची कीर्तन सेवा झाली. तर दि,१८ एप्रिल रोजी ह.भ.प महंत महादेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताह सोहळ्याची सांगता झाली.तसेच आप्पासाहेब दिंडेगावकर महाराज यांच्या हस्ते काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.या सप्ताह सोहळ्यामध्ये येवती,आरळी,खुदावाडी,अणदुर,काटगाव,शिरगापुर,बाभळगाव,सलगरा,किलज,नांदुरी,काळेगाव, बिजनवाडी,फुलवाडी, बसवंतवाडी,आदी पंचक्रोशीतील भजनी मंडळाने सहभाग घेतला होता. हा सप्ताह सोहळा ह भ प गुरुवर्य महेश महाराज माकणीकर, गुरुवर्य ह.भ.प.अप्पासाहेब महाराज दिंडेगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.हा सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी तरूण, वारकरी मंडळ ,महिला भजनी मंडळ ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या