तुळजापूर प्रतिनिधी :-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असणारे शिवसेनेची बुलंदतोफ मा.ना.श्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल दि.१८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९:३० वाजता श्री तुळजा भवानी मातेला आपला कुलधर्म कुलाचार करून दर्शन घेतले.यावेळी त्यांचे पौरोहित्य त्यांचे पारंपारीक भोपे पुजारी रत्नदिप कदम पाटिल यांनी केले.
सन १९९५,१९९९ व २००४ साली मेहकर विधानसभेचे ते सदस्य राहिलेले आहेत.
१९९७ ते ९९ या काळात क्रिडा,युवक कल्याण, व
सिंचन राज्यमंत्री पदावरती कार्य केलेले आहे.तसेच २००९,२०१४,२०१९ व २०२४ सलग चार वेळा बुलढाणा लोकसभेवरती निवडून आलेले आहेत.
यावेळी श्री तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होवू घातलेल्या मंदिर विकास आराखडा
बाबत मंदिर प्रशासनाकडून माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी तुळजापूर शहर शिवसेनेकडून त्यांना कवड्याची माळ घालून देविची प्रतिमा देण्यात आली. याप्रसंगी धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर, शिवसेना शहरप्रमुख बापुसाहेब भोसले, शिवसैनिक अमोल जाधव, गणेश छत्रे आदी शिवसैनिक उपस्थित होते.तसेच मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध देशपांडे,अतुल भालेराव,सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम,दिपक शेळके,श्रीकांत पवार,ऋषभ रेहपांडे,हे मंदिर संस्थानचे कर्मचारी हजर होते.