spot_img
16.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

धाराशिव जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेच्या वतीने शाळा बंद आंदोलन

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर :-विजय पिसे जळकोट

धाराशिवच्यावतीने शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये आणलेल्या जाचक अटीच्या विरोधात दिनांक आठ व नऊ जुलै 2025 दोन दिवस शासनाने दिलेल्या शब्दाच्या नुसार वाढीव टप्पा अनुदान गेली तीन अधिवेशनात तरतूद न केल्यामुळे व सेवक संच जीआर काढून पूर्णपणे बंद केल्यामुळे 15 मार्च 2024 चा शासन निर्णय विद्यार्थी संख्येच्या बाबतीत शिथिलता न दिल्यामुळे व विविध प्रश्नांच्या बाबतीत शासनाला जाग आणण्यासाठी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व खाजगी माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक या सर्व शाळा बंद राहतील या बंदमध्ये सर्व संस्थांच्या अध्यक्ष व सचिव आणि शंभर टक्के योगदान देऊन बंद यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आव्हान जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे जिल्हा सचिव लहूराज लोमटे उपाध्यक्ष अशोक पवार उपाध्यक्ष धनंजय नाना शिंगाडे उपाध्यक्ष पांडुरंग लाटे उपाध्यक्ष दत्ता बंडगर संस्थाचालक संघटनेचे सदस्य श्री वसंतरावजी मडके धनंजय आप्पा पाटील लईक सर आरडी सुळांना गौतमराव शिरसागर बालाजी अलाटे सुहास सरवदे प्रकाश बोंडगे मसुते आप्पा महेश कदम चंद्रकांत हाजगुडे श्रीमती भातलवंडे मॅडम श्री घोगरे गुरुजी परांडा इत्यादी मान्यवरांनी आपापल्या तालुक्यात बंद कसा यशस्वी होईल याचं पूर्व नियोजन करावे वर्तमानपत्रात त्याशिवाय टीव्ही चॅनलला या शासनाच्या विरोधातील धगधगता प्रश्न मांडण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा ही संधी शेवटची आहे ही समजून केवळ आपणच शाळा चालवतो असे नाही तर कर्मचाऱ्यांना सुद्धा सोबत घेऊन गावातली लोक सोबत घेऊन हा बंद यशस्वी करावा अशी आव्हान जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या