अणदूर प्रतिनिधी :-
नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना, प्रभाग क्रमांक 9 मधून शशिकांत (पांडू)पुदाले हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. समाजातील सर्वसामान्यांशी नातं जोडलेला आणि लोकसेवेचा ध्यास घेतलेला हा तरुण नेता भाजपा पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते.
शशिकांत (पांडू) पुदाले हे नळदुर्ग शहरातील तरुण, उत्साही आणि सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत अडचणी – पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे, स्वच्छतेची समस्या, तसेच युवकांना रोजगाराच्या संधी या विषयांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्थानिक प्रश्न मार्गी लागल्याचे नागरिक सांगतात. निवडणुकीच्या तयारीसाठी शशिकांत (पांडू) पुदाले यांनी जनसंपर्क मोहीम सुरू केली असून, नागरिकांशी थेट संवाद आहे.




