spot_img
11 C
New York
Sunday, November 16, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

धाराशिव-पुणे बस मध्यरात्री इंदापूर स्थानकात आली अन्…क्षणात जळून झाली खाक एसटीतील 50 प्रवासी सुखरूप

धाराशिव प्रतिनिधी :-

इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घटना घडली आहे, एसटीत 50 प्रवासी होते, सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली.
या एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तर या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालं आहे.धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली.याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला.तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बसचा पूर्ण नुकसान झालंय.इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घटना घडली आहे, एसटीत 50 प्रवासी होते, सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या