spot_img
11 C
New York
Sunday, November 16, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार – खासदार ओमराजे निंबाळकर…

तुळजापूर प्रतिनिधी :-

आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील, धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख नंदू भैय्या राजेनिंबाळकर,महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडने, ऋषिकेश मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली..!

या बैठकीत ठरविण्यात आले की येणारी तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविण्यात येणार आहे. आघाडीचा उमेदवार हा सर्वसामान्य, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचा विचार करणारा असेल. नागरिकांनी या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूर नगरपालिकेत सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता — असा खेळ सुरू आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांचे प्रश्न मागे पडले आहेत आणि अवैध धंद्यांना चालना मिळाली आहे.

तुळजापूरकरांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ द्यावी, भ्रष्ट सत्तेचा अंत करून तुळजापूरमध्ये स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचे प्रशासन स्थापन करावे, असे आवाहन यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

#shivsena #tuljapur #MahaVikasAghadi

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या