spot_img
11 C
New York
Sunday, November 16, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

लाडक्या बहिणींना दिवाळी फराळ, शालेय साहित्य वाटप पालकमंत्री प्रताप सरनाईक कुटुंबियांकडून पूरग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड

भूम / प्रतिनिधी :-

 

पालकमंत्री प्रताप सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व सरनाईक कुटुंबियांच्या वतीने पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना फराळ वाटप करून दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यात आला. पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबांवर संकट कोसळले असले तरी या उपक्रमामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलत आहे.

अशावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत किराणा किट फराळ किट शालेय साहित्य वाटप चे योग्य नियोजन करून युवासेनेचे पांडुरंग धस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या प्रसंगी पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, “दिवाळी हा आनंद आणि आपुलकीचा सण आहे. संकटातही आपल्या समाजातील प्रत्येक घटकासोबत उभं राहणं हीच खरी दिवाळीची गोडी आहे.”

पूरग्रस्त भागातील महिला नागरिक शेतकरी यांच्या वतीने सरनाईक कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या