धाराशिव (सतीश राठोड ) :-
मराठवाड्यातील बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट महसूल रेकॉर्ड नोंदी नुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून घ्यावे अशी मागणी धाराशिव सकल बंजारा समाजांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , गोर बंजारा समाजास हैदराबाद गॅझेट निजाम काळातील महसूल रेकॉर्ड सण 1881 ते 1941 च्या जनगणनेतील ऐतिहासिक नोंदी तपासून अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे . निजाम काळातील हैदराबाद गॅझेट हैदराबाद संस्थानच्या सण 1881 ते 1941 या कालावधीत त्या प्रशासन स्तरावर झालेल्या जनगणनेतील नोंदीमध्ये बंजारा समाजाचा गौंड आदिवासी समाजासोबत समानता असल्याचे बरेच ठिकाणी उल्लेख दिसून येतो बंजारा समाज हा आदिवासी घटकात मोडत असल्याबाबतही बरेच ठिकाणी ऐतिहासिक नोंदी दिसून येतात बंजारा समाजास गॅझेट मध्ये लमांडा लमाणी अशी अनेक ठिकाणी स्पष्ट नोंदी दिसून येतात बंजारा समाजाच्या खानपान जीवन पद्धती विवाह पद्धती अनेक विषयासंदर्भात ऐतिहासिक नोंदीचे स्पष्ट उल्लेख असून बंजारा समाज हा निश्चितच आदिवासी घटकात गॅझेट मधील नोंदीच्या आधारे दिसून येतो . यामुळे महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करून समितीच्या माध्यमातून नोंदी तपासून एसटी प्रवर्गाचा शासन निर्णय पारित करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील सकल बंजारा बांधवांनी केली आहे . देण्यात आलेल्या निवेदनावर कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषेराव चव्हाण, जहागीरदारवाडी सरपंच शशिकांत राठोड ,उपसरपंच अविनाश चव्हाण, आंबेजवळगे चे नामदेव चव्हाण, मोहन चव्हाण, सिद्धेश्वर चव्हाण, बोरखेडा ग्राप सदस्य बाळासाहेब पवार ,गोरसेना जिल्हा अध्यक्ष मोहन राठोड, हिंगोली चे शहाजी चव्हाण, पोपट चव्हाण ,कालिदास चव्हाण, सचिन राठोड ,रामदास आडे, बालाजी राठोड विजय राठोड छोटू भैय्या राठोड सह बंजारा बांधवाच्या स्वाक्ष-या आहेत.