घरोघरी थाटल्या गौरी महालक्ष्मी येडशीतील सस्ते परिवाराने जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाचा साकारला देखावा
( दि . 31) रविवारी रोजी परंपरेनुसार गौरी महालक्ष्मी पूजन घरोघरी मोठ्या उत्साहात व थाटामाटात केले जात आहे . यानिमित्ताने परंपरेनुसार तीन दिवस हा उत्सव महिला वर्ग घरोघरी साजरा करतात यामध्ये महालक्ष्मी व गणपती सिंहासन स्वरूपात ठेवून त्यापुढे विविध कलाकृती व संदेश देणारे देखावे साकारण्याची परंपरा चालते .या देखाव्यात मध्ये येडशी येथील सौ प्रतिमा महादेव सस्ते यांच्या परिवाराने मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर चालत असलेल्या आंदोलनावर देखावा साकारण्याचा प्रयत्न संकल्पनेनुसार केला आहे .यामध्ये धाराशिव जिल्हातील आमदार खासदार यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट,आजाद मैदान मुंबईतील मराठा आंदोलक व जरांगे पाटिल यांच्या आंदोलनाचा देखावा संकल्पणे नुसार साकारून एक प्रकारे आरक्षणास पांठीबाच दर्शवला आहे .
- Advertisement -