spot_img
17.2 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

ब्रिगेड आक्रमक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले…

सोलापुर / प्रतिनिधी :-

 

संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप पुणे-आक्रमक आंदोलक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अखेर अक्कलकोट मध्ये काळे फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड हे त्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते राज्यभर दौरे करत असतात. आज अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले होते. या कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत होत असतानाच ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण गायकवाड यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत असल्याचा आरोप केला आहे.

या घटनेमध्ये प्रवीण गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीमध्ये बसले होते. मात्र त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून देखील मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आधी देखील संघटनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असून छत्रपती संभाजी ब्रिगेड असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने या संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी दीपक काटे म्हणाले हेाते की,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासीयांसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रात मात्र, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत आहे, ही बाब संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. तरीही संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला फाशी देण्याची भाषा करतात. मात्र स्वतःच्या संघटनेत संभाजी महाराजांचा अवमान होतोय, एकेरी उल्लेख होतोय, याकडे ते दुर्लक्ष करतात, हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला होता.संभाजी ब्रिगेड संघटनेने व पक्षाने नावात बदल केला नाही, तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. संघटनेने ‘संभाजी ब्रिगेड’च्या नावात ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असे पूर्ण लिहावे, अशी मागणी देखील शिवधर्म फाउंडेशनने केली होती.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या