धाराशिव ( सतीश राठोड ) :-
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांचा धाराशिव जिल्ह्यातील बंजारा बांधवांच्या वतीने तुळजाभवानी देवीची प्रतिमा व तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ भेट देऊन सन्मान केला .
जलसंधार मंत्री संजय राठोड हे सोलापूर येथे प्रभाकर महाराज मठामध्ये विदर्भाची पंढरी शेगावच्या संत गजानन महाराजांचे पालखी विसावा होता या स्थळी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेतले याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांचा माता तुळजाभवानीची कवड्याची माळ व तुळजाभवानीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला व जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी धाराशिव जिल्ह्यातील विविध तांड्याच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्या ची सोडवणूक करण्यासाठी व कार्यकर्त्याच्या भेटीसाठी लवकरच धाराशिव जिल्हा दौरा करणार असल्याचे बोलताना सांगितले . याप्रसंगी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे विदर्भ व मराठवाडा विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार , तुळजापूर येथील एडवोकेट राज राठोड , संजय भाऊ राठोड यांचे समर्थक सचिन राठोड , खुदावाडी तांडा येथील बंजारा समाजाचे नेते सुरेश राठोड , नागेश पवार , शहाजी चव्हाण , मिथुन पवार सह बंजारा बांधव कार्यकर्ते उपस्थित होते .