spot_img
-3 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले

मुंबई प्रतिनिधी –

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

 

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या